एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!

Empowering People with Disabilities
(दिव्यांगांसाठी सक्षम आधार)

दिव्यांगांसाठी आम्ही संसाधने आणि संधी उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी आणि समाधानी जीवन जगण्यास मदत करतो.
आरोग्य शिबिरे
0 +
गरजु दिव्यांगांना हायटेक पाय
0 +
संस्थेची स्थापना
0

Key Initiatives - संस्थेचे महत्त्वपूर्ण उपक्रम

आमचे ध्येय दिव्यांग व्यक्तींना शिक्षित करणे आणि त्यांना आवश्यक ज्ञान व जीवनकौशल्ये प्रदान करून समाजात उपयुक्त व स्वावलंबी बनवणे आहे. आम्ही कौशल्यविकास केंद्रांद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण करतो आणि शारीरिक दिव्यांगतेवर मात करण्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करतो.

कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार

आम्ही सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत करतो. स्थानिक संस्था व उद्योगांच्या सहकार्याने दिव्यांगांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करतो.

Skill Training and Employment

We provide skill training to educated unemployed disabled individuals, helping them secure jobs and contribute to society. Through partnerships with local organizations and industries, we aim to create a better future for people with disabilities.

कृत्रिम अवयव सहाय्यता

CSR निधीच्या मदतीने आधार संस्थेने विदर्भातील शेकडो दिव्यांगांना उच्च-तंत्रज्ञानाच्या कृत्रिम पायांची नि:शुल्क उपलब्धता केली आहे. आमचे प्रयत्न त्यांना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवन जगण्यास सक्षम करतात.

Prosthetic Support

With the help of CSR funds, Aadhar Sanstha has provided hundreds of free high-tech prosthetic limbs to disabled individuals in Vidarbha. Our efforts ensure that they lead a dignified and independent life.

आरोग्य शिबिरे

विविध दिव्यांगतांवर मात करण्यासाठी आम्ही नियमित आरोग्य शिबिरांचे आयोजन करतो, उपयुक्त साहित्य पुरवतो आणि वैद्यकीय मदत प्रदान करतो, ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींवर त्यांचे दिव्यांगत्व कमी होते.

Health Camps

Regular health camps are conducted to address various disabilities, provide assistive devices, and offer medical support, helping individuals reduce the impact of their disabilities.

How You Can Help Aadhar Sanstha संस्थेला आपली मदत कशी उपयुक्त ठरू शकते

आपली उदार देणगी आणि प्रायोजकत्व एखाद्या दिव्यांग व्यक्तीचे जीवन बदलण्याची ताकद ठरू शकते. आर्थिक सहाय्य असो किंवा आवश्यक संसाधने पुरविणे असो, दिव्यांग व्यक्तींना आपला हातभार अमूल्य आहे.

आपण उपचार, शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव किंवा आरोग्य तपासणी शिबिर प्रायोजित करून त्यांचं जीवन सुलभ करू शकता. यासोबतच, एखाद्या दिव्यांग व्यक्तीसाठी कौशल्यविकास कोर्स प्रायोजित करून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होण्यास मदत करू शकता, ज्यामुळे त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल.

Hi I'm Jeremias

Hi I'm Arjun Patel

आधार संस्था आणि वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर यांनी समेकित क्षेत्रीय कौशल विकास, पुनर्वसन, आणि दिव्यांगजन सशक्तिकरण केंद्र (सी.आर.सी), नागपूर यांच्या सहकार्याने नागपुरातील क्रिडा प्रबोधिनी हॉल येथे २८ जुलै २०२४ रोजी श्रवणदोष बाधित दिव्यांगांसाठी विशेष तपासणी शिबिर आयोजित केले. या शिबिरात एकूण ९० श्रवणदोष असलेल्या दिव्यांगांची कानाची तपासणी करण्यात आली. या उपक्रमामुळे श्रवणदोषाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना […]